STORYMIRROR

Renuka D. Deshpande

Inspirational

3  

Renuka D. Deshpande

Inspirational

गरीब, वेदना आणि आनंदी

गरीब, वेदना आणि आनंदी

1 min
1.0K

माझ्या या देशात नाही हो कोणी तारणहार ..

नाही हो कोणी असे जे गरिबांचे दुःख हरणार..

गरीबी आणि वेदना येतात एक साथ..

कोण देणार हो या गरिबांना मदतीचा हात..


येती कित्येक सरकारे आपल्या देशात..

आणतात गरिबांसाठी योजना पण फायदा श्रीमंतांच्या दारात..

गरीब राहतो गरीबच..

श्रीमंताला श्रीमंतीच..


कागदोपत्री गरीब होतात श्रीमंत ..

पण वास्तवात भ्रष्टाचारी आहे सगळे तंत्र..

दोन वेळ खाण्या इतपत नाही अन्न धान्य..

पण बेईमानीचे जीवन जगणे नाही त्यांना मान्य..


दोन घास अन्न खाऊनही जगतात आनंदी..

फरक नाही पडत त्यांना असो कोणती मंदी..

जाणीव नाही कोणा त्यांच्या व्यथेची..

कोण ऐकेल कथा त्यांच्या वास्तविकतेची...


एवढ्या वेदना सोसताना नाही कोणती तक्रार..

आनंदी जीवन जगतात बनतात पालनहार..

कष्ट करतात राबतात शेतात..

अन्न धान्याची सारी गरज भागवतात..


अन्नदाता बनून सगळ्यांना करतात सुखी ...

वाटते त्यांना ना राहावे कोणी दुःखी..

आशा आहे हळूहळू सुधारेल गरिबांची परिस्थिती..

होतील समृध्द, येईल त्यांच्या प्रगतीला गती..

मान्य करा कोणी अथवा नाही..

एक दिवस येईल गरीब, गरीब राहणार नाही...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational