STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others

ग्रामगीता

ग्रामगीता

1 min
215

ग्रामगीता छान । सर्वांनी वाचावी ।

शिदोरीच खावी । आयुष्यात ।।


कसे वागायचं । कसे जगायचं।

कसे रहायचं । सार त्यात।।


गाव ते आदर्श । कैसे हो ठेवावे ।

मर्म ते जाणावे । जीवनाचे ।।


अंधश्रद्धा खोटी,। ना जातीयवाद ।

लिही निर्विवाद । तुकडोजी।।


ग्राम सुधारावे । आदर्श ठेवावे ।

खेड्याकडे जावे । बोध खरा ।।


तरूणांना स्फुर्ती । सर्वधर्म सम ।

सोडूनिया गम । रहावे गा।।


खंजिरीचा नाद। किर्तन करीत।

प्रचार करत । तुकडोजी ।।


राष्ट्रसंत थोर । दिली हो उपाधी ।

कारागृह आधी । भोगलासे।।


स्वातंत्र्यकाळात । केला हो प्रचार।

समाजा आकार । येऊ लागे ।।


ती सामुदायिक । केली हो प्रार्थना ।

पावन जीवना । करीतसे ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational