STORYMIRROR

Sharad Kawathekar

Abstract

4  

Sharad Kawathekar

Abstract

गोठलेलं दुःख

गोठलेलं दुःख

1 min
446

सुन्न आणि शांत 

घात झालेली रात्र 

निःशब्द स्तब्ध एकांत

एकाकी रात्र 

काळीकुट्ट रात्र 

स्मशानातल्या चितेवर

झाला प्रकाश

उर भरला बांध फुटला 

गोठ्यातल्या गाई म्हशी न्

वाडाही पोरका झाला

पेटण्याआधीच चिता

भावनांचा थरकाप झाला

अंत झाला घात झाला

त्या सुन्न शांत रात्री 

एकांत दाटला

काळीज फुटलं

उठलं काहूर

झाला पाचोळा

पाचोळा भिरभिरत राहिला 

वावटळीतल्या त्या धुलीकणांबरोबर

वेदना दगड झाल्या 

आभाळ पेटलं

मन पेटलं

पेटल्या रानात 

सगळं कसं 

शांत शांत झालं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract