STORYMIRROR

Varsha Pannase

Classics

3  

Varsha Pannase

Classics

गोंधळ

गोंधळ

1 min
418

उदे ग अंबाबाई हाकेला माझ्या धावं

गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला यावं


गोंधळी बुवा जरा सांगाल का करवीरच्या महालक्ष्मीची कथा

सांगतो ऐका.............

माञा २५


वैकुंठात लक्ष्मी विष्णूचे वास्तव्य होते

भृगु ऋषी विष्णूस भेटण्या गेले वैकुंठी

शेषशायी विष्णू निद्रावस्थेतं शेष पाठी 

माता लक्ष्मी पाय चेपते हरी निद्रेसाठी


बोला अंबाबाईच्या नावानं उदो उदो ...

बोला महालक्ष्मी च्या नावानं उदो उदो..


भृगु ऋषी पातले त्या समयी वैकुंठासी

ऋषी होते शिघ्रकोपी राग आला त्यासी

अपमान अनावर होई महा ऋषीश्रेष्ठासी

क्रोधित भृगु पाय ठेवला विष्णू छातीसी


बोला अंबाबाईच्या नावानं उदो उदो

बोला महालक्ष्मी च्या नावान उदो उदो....

  

क्षमा मागीतली विष्णूने भृगु ऋषींची

साक्षात भगवान मागतो क्षमा भृगुची

होते किती महानं ऋषी मुनी त्या काळची

झाली अपमानीतं लाडकी लक्ष्मी विष्णूची


बोला अंबाबाईच्या नावानं उदो उदो..

बोला महालक्ष्मीच्या नावान उदो उदो..


गेली विष्णूपत्नी लक्ष्मी सोडून वैकुंठास

निघाली लक्ष्मी वसली करविर,कोल्हापुरासं

 प्रगटली दक्षिण कांक्षिणी करविर निवासीनी

सकलांची जननी महालक्ष्मी महाराष्ट्रातं


बोला अंबाबाईच्या नावानं उदो उदो....

बोला महालक्ष्मी च्या नावानं उदो उदो..


होता अक्राळ विक्राळ दानव गाव करविरास

रक्त लागे मनुष्याचे रोज छळे रयतेसं

केला कोलासुर वध महालक्ष्मीने क्षणातं

 म्हणून कोल्हापूर नाव करविर गावासं


बोला अंबाबाईच्या नावानं उदो उदो

बोला महालक्ष्मी च्या नावानं उदो उदो..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics