STORYMIRROR

मैथिली कुलकर्णी

Inspirational Others

4  

मैथिली कुलकर्णी

Inspirational Others

गोडी वाचनाची

गोडी वाचनाची

1 min
274

गुरुवर्य आमचे

शाळेतील एक--

वाचत नेहमी

पुस्तके अनेक ।।


ज्ञानात भर

पडे पुस्तकाने--

जपत ते त्यांस

अति मित्रत्वाने ।।


वाचनाची गोडी

त्यांच्यामुळे लागली....

ऋण हे मोठे

वाचत राहिली ।।


मराठी भाषा समृद्ध

साहित्य अफाट...

संस्कृती जाणण्या

वाचण्याचा घाट ।।


प्रभाव पडतो

वाचनाचा फार....

वाचन आपले

जीवन घडवितो ।।


एक तरी पान

नित्य वाचावे....

वसा ज्ञानामृताचा 

नवपिढीला द्यावे ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational