STORYMIRROR

Sangita Pawar

Classics

4  

Sangita Pawar

Classics

गणपती विसर्जन

गणपती विसर्जन

1 min
870

गणपती घरी आले

वाहे नवचैतन्याचे वारे

कसे गेले दहा दिवस

सुनी सुनी होतील दारे ||


निरोपाचा आजचा क्षण

येती बाप्पा तुझ्या आठवणी

किती केली तुझी आरस

माझ्या मनी त्या साठवणी||


देऊन निरोप बाप्पाला

रिकामे आता झाले घर

बप्पाचे आसन रिकामे

नयनी ओघळते सर ||


सारे घरच झाले खाली

निरोप देतात तूजला

होता तुझा सहवास

आता कंठ माझा दाटला||


निरोप घेतो बाप्पा आनंदानं

कोरोना विषाणूचा नाश कर

सर्वांनाच घेऊ दे मोकळा श्वास

सर्वांची झोळीआरोग्याने भर ||


गणपती चालले त्यांच्या गावा

निरोप घेतो आम्ही आज्ञा असावी

चुकले असेल काही आमचे

तर बाप्पा आनंदाने क्षमा करावी.


*गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या----


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics