STORYMIRROR

Priyanka Kute

Classics Inspirational

3  

Priyanka Kute

Classics Inspirational

गणपती बाप्पा

गणपती बाप्पा

1 min
205

गणाधिशा लंबोदरा

वक्रतुंडा गजानना

दर्शनमात्राने तुझ्या

सुख मिळते मना


एकदंता गणेशा

विघ्नहर साक्षात

माऊलीची किती 

रुपे रे बाप्पा तुझ्यात


कृष्णपिंगांश गजवक्र

विघ्नराजेंद्र विनायक

लंबोदर धुम्रवर्ण

भालचंद्रा गुणी बालक


वाट पाहावी तुझ्या आगमनाची

आतुर अवस्था झाली मनाची

सामोरी येता पारणे फिटे डोळ्यांची

तुझ्याच नामस्मरणात इच्छा जगण्याची


लाडू , मोदक , पेढा

तुझ्या नैवद्याला 

तू असताना तुला

प्रत्येक नैवेद्य अर्पिला


असाच ठेव आशिर्वाद

राहूदे छाया तुझी

देवा भावली का तुला

थोडकी शी भक्ती माझी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics