गणगोत
गणगोत
देऊन मदतीचा हात,
बाबाने माझा गणगोत सांभाळला.
जाण नाही एकानेही ठेवली,
जो तो आता फुसकारू लागला.
भावंडांच्या शिक्षणासाठी,
बाबाने बहू कष्ट भोगले.
मारूनी जीवाला चिमटा,
त्यांनी प्रत्येकास पायावर उभे केले.
जीवनात जे भोग त्यांनी भोगले,
ते दुसऱ्याच्या वाट्याला नको म्हणून झटले.
आईने ही अन्नपूर्णा होऊन वाढले.
तेच आता टाळू वरचे लोणी खाऊ लागले.
सापालाच दुध पाजल.
आयत्या बिळावर नाग डोलले.
खाऊन दुध,तूप,लोणी,
त्यांच्याच लेकरावर जळू लागले.
स्वतः च्या पैश्याचा मोल खरा.
दुसऱ्याच्या पैसा तो चिंचूका.
देणाऱ्याचा हात ही खाऊन,
माज दाखवतोय,गणगोत अन् काका.
पैशाचा हा खेळ सारा.
पैसे देतो त्यांच्याकडे गणगोत पसारा.
भोळ्या माणुसकीच्या स्वभावास,
लुटून तुलाच म्हणतोय बेचारा.
