गणेश चतुर्थी
गणेश चतुर्थी
श्रावण मास समाप्तीला
भाद्रपद शुक्ल चतुर्थीला
जन्म असे गणेश अवतारा
श्रीगणेश चतुर्थी या दिवसाला ||
हिंदू धर्मात विशेष महत्त्व
चतुर्थीला गणेशाचा मान
पूजा करूनी स्थापना घरी
कार्यारंभी असे गणशां स्थान||
संघटनेची, विद्येची ती देवता
सर्व गणांचा असा अधिपती
ज्ञान, समृद्धीचे असे प्रतीक
पुरातन रूप असे गणपती ||
करुनी घरी प्राणप्रतिष्ठा
जास्वंद व दुर्वा वाहती
नैवेद्य असे उकडी मोदक
नवचैतन्याने घर हर्षती ||
सुखकर्ता, दु:खहर्ता अशी
करीतो आम्ही आराधना
अमंगल वातावरण नष्ट करूनी
सुखात ठेव सर्व सकलांना ||