STORYMIRROR

Vasudha Naik

Romance

4  

Vasudha Naik

Romance

गंध प्रितीचा

गंध प्रितीचा

1 min
209

ओल्या बटा मुखावर तुझ्या

वेड लावी माझ्या जीवाला

पाहून गालावरील खळी ती

भूल पडली तुझी मनाला...


बटा सारूनी केसामागे तू

नकोस त्यांना ठेवू तू दूर

गंध हो ना तू प्रितीचा 

मनात माजलंय गं काहूर...


ओलेती देखणी तू सुरेख नार

पाहताच वाटे मिठी मारावी

ओली बट तुझ्या गालावरील

हळूच हाताने बाजूला सारावी...


पैंजण पायी हळू रूणझुणले 

हाती कंकण मंजूळ नादियले

मुखकमल तुझे लज्जीत झाले

तू तुझे सर्वस्व मज वाहियेले...


ओल्या बटांनी केला गोडवा आपल्यात

मधूर क्षणांचे घट भरले आनंदात

मिठीत सामावलो तुझ्या मी आता

गोड शहारे उठती रोमारोमात...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance