STORYMIRROR

Suhas Bokare

Abstract

3  

Suhas Bokare

Abstract

गझल

गझल

1 min
141

हलक्या ग्रहणांनी यावे 

ह्रदयात व्रणांनी यावे 

 

गझलेत मला भेटाया

निसटून क्षणांनी यावे 


जग चार क्षणांचे आहे 

सुखदुःख कणांनी यावे 


रडक्या दुखण्यांनाही त्या 

फसवीत सणांनी यावे?


विणतो ह्रदयी जाळ्यांना 

उबदार विणांनी यावे


गजलेस हवे जे बिंदू 

तितक्या किरणांनी यावे


तडजोड खयालांची ही 

गझलेत रणांनी यावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract