गझल चुंबनाची
गझल चुंबनाची
जेव्हा कळ्यांना जाग आली
मिठी तुझी सैल झाली
दोन लाल गुलाब
फुलले पहाटेच्या शयन महाली
अधीर अधीर भ्रमर झाले
पुन्हा उष:काली
मधु सेवनाने गाली
गुलाबास लाली
दोन ओठी गुज झाले
धुंद झाल्या मैफिली
चुंबनाची गझल जमली
अवीट गोडी चाखली
अणू -रेणु तृप्त झाला
गात्री रात्र रंगली
दोन वेड्या जीवनाची
मिलनात व्यथा दंगली
सूर तो गवसला
तार कोणी छेडिली
प्रेम राग आळवीता
लक्षदीपे पेटली
लक्षदीप ही फिके
प्रेम ज्योती उजळली
राग अन रागिणीत
प्रीती गाथा उमलली

