STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

गजानन महाराज आरती

गजानन महाराज आरती

1 min
430

जयदेवा जयदेवा, जय गजानना

आरती ओवाळू, ह्या परब्रम्हांना // धृ //


अचानक जगी, तू प्रगटलासी

शेगाव ग्रामासी, भोजन सेविसी

काय वर्णावे मी, तुझिया लीलांना   (1)


कुत्सितांनी तुज, दूषण दिधले

परि सामर्थ्याने, तू सत्य दाविले

भक्तांच्या हाकेला, धावुनिया ये ना   (2)


अगाध महिमा, अपार शक्तीचा

विद्यावाचस्पती, मुखोदगत वाचा

वरदान लाभे, त्या श्रद्धावंतांना (3)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract