घर....
घर....
घर चार भिंतींचे
एकमेकांशी अन् आल्या-गेल्याशी
आपसूक जिव्हाळा जपणारे,
प्रेमाचा वर्षाव करणारे,
प्रत्येक गोष्टीचे मांगल्य
अभाधित ठेवणारे,
भल्या बुऱ्याची जाणं
करून देणारे,
थोरामोठ्याचे आशीर्वाद
मिळवून देणारे,
प्रत्येक संकटाला उंबऱ्यातूनच
माघारी पिटाळून लावण्याची
धमक असलेले,
आणि सर्वांना एकोप्याने
बांधून ठेवणारे.
