STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Inspirational

3  

Sanjay Dhangawhal

Inspirational

घर दोघांचे

घर दोघांचे

1 min
384

रोज रोज भांडण तिचे

खूप प्रेमळ असते

तिच्या रागावण्यातही

खरं प्रेम दिसते


दिवसभर काम करूनही

ती कधीच थकत नाही

त्याची काळजी घेतल्याशिवाय 

घास तिच्या पोटात जात नाही


सुख म्हणजे काय

 तिला माहीत नसते

तो घरी आल्याशिवाय

ती देवघरात दिवा लावत नसते


आजारपण तिच ती

आनंदात घालवते

दारात उभी राहुन ती

वाट त्याची पाहते


कसलीच अपेक्षा 

ती करत नाही

घर परिवाराशीवाय तिला

दुसर काहीच माहीत नाही


नको म्हटले तरी ती

राग त्याच्यावरच काढते

प्रदक्षिणा तिची पौर्णिमेला

त्याच्यासाठी असते


त्याला विचारल्याशिवाय ती

काहीच करत नाही

राग रूसवा असला तरी

त्याच्याशिवाय राहत नाही


तिचं जगणं म्हणजे 

त्याचं आयुष्य असते

त्याच्यासाठीच तर

तिचे जगणे असते


खरतंर आयुष्य 

तिचे आणि त्याचेच असते

भांडण त्याच्याशी असले तरी

घर दोघाचंच असते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational