घोंघावणारा वारा
घोंघावणारा वारा
घोंघावणारा वारा
तुला - मला वेडावत होता
आणि किनाऱ्याच्या पाण्याने
स्वतःच बेभान होत होता
त्याच पाण्याने तुझं
माझ्याशी गुढ संवाद साधणं
आणि झटकन जवळ येऊन
तु मला बिलगणं
मी श्वासात कंठ रोखून
फक्त तुझ्याकडे पहात होते
हे स्वप्न की सत्य
माझे मलाच उमगत नव्हते
नाही म्हटलं तरी तु मला
तुझंच करुन टाकलं होतं
पण फेसाळणाऱ्या लाटांनी
हे गुपित मला सांगितलं होतं
