STORYMIRROR

Rohit Khamkar

Inspirational

4  

Rohit Khamkar

Inspirational

घमंड

घमंड

1 min
270

काय समजतेस स्वतःला, तूझ सम कोनी नसेल.

ज्या जागेचा एवढा आभिमान, ती उद्या दुसऱ्याची असेल.


तू ही केलीस जागा, कोण्या तरी दुसऱ्याला बाजू सारून.

उद्या कोनी तरी दुसरा येईल, जिंकेल पराक्रम पुरून.


तो असो वा त्याच्या पुढचा, सगळ्यांना आहे ते येणे जाणे.

आज खणखणीत वाजणारंच, ते उद्या होईल नकली नाणे.


अहंकार तो उरी घेऊनी, मिरवत आहे सगळीकडे.

वशीकरण झाले बुद्धीला, साम दाम दंड भेद गडे.


सरते शेवटी सगळं नश्वर, नक्कीच केव्हा ना केव्हा संपणार.

कधी लवकर कधी उशिरा, सगळं संपल्यावर सुधारणार.


अहंकार तो स्वभावाचा, बुद्धी ने दिला दंड.

सगळंच सुटणार असेल शेवटी, तर काय कामाचा घमंड.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational