STORYMIRROR

AnjalI Butley

Tragedy Others

3  

AnjalI Butley

Tragedy Others

घालमेल

घालमेल

1 min
385

घालमेल मनात चालु असतांनाही

शहरातल्या फ्लॅट संस्कृतीत

स्थलांतरीत झालो काम धंदा, मुलांच्या शिक्षणासाठी

तोडून गावाकडचे काही पाश...


कोंबड्याच आरवण, पक्षांची किलबिलाट चिवचिवाट

गजर म्हणुन नव्हती अवती भवती

सकाळी लवकर उठण्या 

मग होई रोजच उशिर...


घडाळ्यांच्या काट्यावर चालण्याची

नव्हती सवय आम्हा

पक्षांची किलबीलाट, देवळातील घंटा, सूर्याच उगवण, मावळण, किरणांची सावलीच

होत आमच घड्याळ


घरासमोरच्या छोट्या जागेत

सकाळी काढत असे रांगोळी छान

शेजारच्यांना हेवा वाटत

येता जाता पायाने पुसून टाकत...


तिन्ही सांजेचा अंगणातील तुळशीपाशी लावणारा दिवा

खिडकितल्या छोट्या डब्यात लावलेल्या तुळशीपाशी लावला

पण वार्याच्या झोतात

पटकण विझत गेला...


कामधंदा मिळाला 

चार पैसे आले हाती

मुलांचे शिक्षण झाले

दुर देशी सोडून गेले ते आम्हास...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy