गेलीस सोडून आई..
गेलीस सोडून आई..
घराला या घरपण आहे
आई तुझ्या मुळं,
गेलीस सोडून आम्हा
ही कशी आली वेळ...
गेलीस तू आई
वय नव्हतं लई,
तुला नव्हती मुळीच
कसली रोगराई
त्यागलीस अन्नपाणी
सांग कशामुळं...
कसं सोडून आम्हा
जावं वाटलं तुला ?
तुझ्यासाठी देवाला
नवस खूप केला,
आठवण तुझी येते
अश्रू आपोआप गळं...
कोसळला आम्हावर
दुःखाचा डोंगर,
लागे हुरहूर जीवा
कसा देवू धिर,
फाटली ही धरणी
कोसळलं आभाळ...
कशापायी आम्हावर
रुसून तू गेलीस ?
का बरं दोन घास
तू नाही खाल्लीस ?
तुझ्यासाठी किती हा
जीव तळमळ...
नाही आली कीव
दुष्ट त्या देवाला,
गेलीस तू निघून
कोणत्या गावाला ?
तुजवीण कोण करील
आमचा सांभाळ...?
कधी, कुठे, कशी
भेटशील आई ?
रात्रंदिन तुझीच
आठवण येई,
लई आली आम्हावर
वाईट ही वेळ...
