गडकिल्ले
गडकिल्ले
उंच डोंगरावरच्या गडकिल्ल्यात
शूर पराक्रमी राजे वसले
तटबंदीच्या कानाकोपऱ्यात
मराठ्यांचे नाद घुमले ..
इतिहासाच्या लढाईचा पुरावा
हेच अभेदय किल्ले बनले
स्मृतीत विरल्या आठवणीत
काही किल्ले उध्वस्त झाले
पर्यटकांचे सुखद क्षण
उंच डोंगरावर रिसॉर्ट बनले
फोटोतल्या बंदिस्त किल्ल्याना
कृत्रिम हसू चित्रात फुलले
गडावरचे सौन्दर्य आता
डोंगरावरचे जंगल बनले
साहसी कथेच्या वास्तूमधले
फक्त दिवाळीत किल्ले बनले.
