Shobha Wagle

Inspirational

3  

Shobha Wagle

Inspirational

गाव

गाव

1 min
11.8K


वृत्त मंजुघोषा 


गालगागा गालगागा गालगागा


गाव माझा छान आहे पाहुनी ये

फक्त तेथे एक वेळा जाऊनी ये


रात्र काळोखी भीती वाटे तुला रे

साथ कोणाची तरी ती घेऊनी ये


साप आहे खूप तेथे पाय वाटे

फक्त हाती एक काठी पकडुनी ये


लोक येथे छान आहे शांत प्रेमळ

प्रेम त्यांचे आज तेथे मिळवुनी ये


देव भोळ्या माणसांना जाण आता

त्याच करता आज गावा भेटुनी ये


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational