Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sangita Pawar

Inspirational Others

4  

Sangita Pawar

Inspirational Others

गांधीजी आज असते तर --

गांधीजी आज असते तर --

1 min
234


आज गांधीजी असते तर ----,

सद्यस्थितीवर काय म्हणाले असते?

राजकारणाचे कौतुक केले असते ?

की सर्वांवर रागविले असते ||


हिशोब विचारला असता का?

स्वातंत्र्यानंतरच्या कारभाराचा

शिक्षणाचा बाजार पाहून तुम्ही

मार्ग दाखवला असता जंतर-मंतरचा ||


आज असता तर बापू तुम्ही--

आरक्षणाचा मुद्दा पेटला नसता

विश्वबंधुत्वाची स्मृति ठेवूनी मनी

भ्रष्टाचार आज झालाच नसता ||


ऊन,वारा ,पाऊस ,तुरुंग सारे  

स्वातंत्र्यासाठी तुम्ही सोसला

का हो ?सध्याच्या सरकारने

इंडिया,भारतचा मुद्दा काढला||


आज बापू तुम्ही असता---

स्वछतेचा दिलाअसता मंत्र

खेड्याकडे घेवूनी गेला असता

समजावलेअसते शेतीचे तंत्र ||


आज तुमचे सत्याचे शस्त्र 

आत्ता असत्याने जात आहे

म्हणूनच बापू आज सारा देश

तुमची आठवण काढत आहे ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational