STORYMIRROR

Meghnath Khatal

Classics Fantasy

4.8  

Meghnath Khatal

Classics Fantasy

From Strangers to Friends – Engineering First Year

From Strangers to Friends – Engineering First Year

1 min
20

पहिल्या वर्षाच्या आठवणी... अनमोल मैत्रीचा प्रवास ❤️

(ही कविता मी First Year पूर्ण करून Second Year मध्ये प्रवेश केल्यानंतर, पहिल्या वर्षातील सुंदर आठवणींना उजाळा देण्यासाठी लिहिली आहे.)

सोबत घेऊन नवे मित्र, नवा विश्वास,
९ सप्टेंबर २०२४ पासून सुरू झाला हा खास प्रवास.

१० सप्टेंबरचा तो पहिला दिवस,
उजेडातही वाटे काळोख,
ना कोणाची साथ, ना कोणाची ओळख.

शोधला मित्र, शोधली Division, शोधला Class,
मनात एकच प्रश्न—
पुन्हा मिळेल का तसाच आनंद आणि तसाच सहवास?

पहिलं Semester – मैत्रीचं राज्य

त्यात Mechanics Formulae चा राजा,
आणि BEEE त्याची बहिण.

Physics Theory चा जणू गुलाम,
तर Biology Theory ची Queen.

दुसरं Semester – मस्तीचं साम्राज्य

Chemistry ने Physics ला मानलं गुरु,
तर Material Science ने पुन्हा Theory केली सुरू.

Graphics ने Logic ची केली Holi,
तर Civil आणि Mechanical म्हणजे जणू झोपेची गोळी.

Semester झाली...
मित्र हळूहळू डिस्कनेक्ट झाले.

संपलं पहिलं वर्ष,
संपला मैत्रीचा एक सुंदर अध्याय.

पण कनेक्टेड नेहमीच राहो,
कारण अजूनही सुरू आहे
Friendship चा Wi-Fi.

संपलं होतं मैत्रीचं राज्य,
मस्तीचं ते साम्राज्य.

कारण १५ जूनला
Department नुसार झाली फाळणी.

पण...

जीव अजूनही अडकलाय त्याच मित्रांमध्ये,

आणि शेवटपर्यंत जपणार
तोच सहवास, ते अविस्मरणीय क्षण.
त्या मैत्रीच्या आठवणी,

कारण वर्ष संपतं,
Semester बदलतात,
Department बदलतात...

पण खरी मैत्री कधीच बदलत नाही. ❤️


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics