STORYMIRROR

Meghnath Khatal

Fantasy Inspirational

4.5  

Meghnath Khatal

Fantasy Inspirational

आयुष्य असंच जगावं लागतं

आयुष्य असंच जगावं लागतं

1 min
8

आयुष्य असंच जगावं लागतं


जे घडेल ते सहन करावंच लागतं,
बदलत्या जगाबरोबर बदलावंच लागतं...
आयुष्य असंच जगावं लागतं.

कुठून सुरू झालं हे माहीत असलं तरी,
कुठे थांबायचं हे ठरवावंच लागतं...
आयुष्य असंच जगावं लागतं.

दुःख आणि अश्रू मनातच दडवावे लागतात,
हसता नाही आलं तरी हसावंच लागतं...
आयुष्य असंच जगावं लागतं.

पंखांमध्ये बळ आल्यावर घर सोडावं लागतं,
आकाशात कितीही उंच झेप घेतली,
तरी घरपण कधीच सोडायचं नसतं...
आयुष्य असंच जगावं लागतं.

इच्छा असो वा नसो,
जन्मभर मन मारून जगावं लागतं;
पण जग सोडताना मात्र
समाधानाने जावं लागतं...
आयुष्य असंच जगावं लागतं.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy