एकटा जीव सदाशिव
एकटा जीव सदाशिव
1 min
1.6K
लढतो स्वतःच्या हिंमतीवर
विश्वास ठेवतो स्वतःवर
अवलंबून राहत नाही कोणावर
घाबरत नाही धमक्यांना
धमकवतो प्रत्येक संकटांना
कधीकाळी रोखुनी धरतो श्वासांना
आहे स्वतःचाच सारथी
बनत नाही कशासाठीपण स्वार्थी
कर्तृत्वाचे धडे शिकवतो जगाला मनाने निस्वार्थी
आयुष्यालाही वाटतो माझा अभिमान
जपतो उरशी स्वाभिमान
स्वतःलाच वाटतो स्वतःचा सन्मान
अभिमानाने सांगतो सर्वांना नाव
एकटा जीव सदाशिव
एकटा जीव सदाशिव