एकरंग
एकरंग


(अष्टाक्षरी रचना )
राधा ती यमुनेकाठी
वाट पाहे नंदलाला
होई कावरी बावरी
जेव्हा न दिसे गोपाला
धुन बासुरीची येता
वृक्ष-वेली त्या डुलती
वाहे वारा झुळझुळ
लाटाही त्या लहरती
राधा हाक मारी कान्हा
पर्ण सारुनी शोधती
मनमोहना लपला
कुठे कुठे तो बघती
प्रेम तयांचे अमर
युगानुयुगे ते पाहतो
एकरंग राधा कृष्ण
जळी स्थळी तो दिसतो
कृष्ण सावळा मोहना
प्रतिबिंब ते पाण्यात
झाली बावरी पाहुनी
कृष्ण रंगी हृदयात