STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

एकात्मता गीत

एकात्मता गीत

1 min
1.4K



जात, धर्म,प्रांत, राष्ट्रवाद नसू दे

रक्तात फक्त जात भारतीय असू दे

नको द्वेष भावना, मन मोकळे असू दे

माणूसकीची भावना मनात रुजू दे


दीर्घ रोग जातीचे समूळ नष्ट होऊ दे

मानव म्हणून वागविण्यास इच्छा असू दे

स्वार्थी बुद्धी ,लोभी मन, दुःख संपू दे

तू एक प्रवासी याची जाणीव असू दे


सात्विक विचार, भले करण्याची बुद्धी येऊ दे

सर्वांना जगण्यासाठी काम मिळू दे

उपासीपोटी कधीच कुणी विश्वात राहू नये

ही शुद्ध भावना मानवा मनी वसू दे


हीच देवपूजा आणि हीच सेवा राहू दे

प्रेम, बंधूभाव,विश्वविचार नांदू दे

हीच मूल्ये भारतात नित्य वसू दे

संस्काराची शिदोरी जीवनी असू दे

शिक्षणाची गंगा घरा घरात येऊ दे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational