STORYMIRROR

Gayatri Sonaje

Tragedy

3  

Gayatri Sonaje

Tragedy

एकांता

एकांता

1 min
245

हा एकांत आता

ओसंडूनी वाहे

घेशील कवेत मला

आतुरतेने वाट पाहे...


प्रतीक्षा मनाचीही

जणू संपली आहे

भेटशील कधीतरी

ती आस मिटली आहे...


किती काळ आता

वाट तुझी मी पाहू

तुझ्याविना इकडे

कशी काय मी राहू...


खेळ हे प्रारब्धाचे

कसे कोणी बघावे

सांजवेळी सख्या रे

मिठीत मला घ्यावे...


दुरावा हा मनाचा

संपवून टाक एकदा

तुझ्याचसाठी जन्म

घेतले मी कितीदा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy