Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

BABAJI HULE

Abstract Tragedy

3  

BABAJI HULE

Abstract Tragedy

एक राजमहाल बनतोय ---

एक राजमहाल बनतोय ---

1 min
226


एक राजमहाल बनतोय ---

जेव्हां तडफडत होती लोकं 

जेव्हां तडफडून मरत होती लोकं 

जेव्हां ऑक्सिजन साठी तरसतायेत लोकं 

तेव्हां करोडोचा एक बनतोय राजमहाल --

जेव्हां व्हेंटीलेटरच्या शोधात भटकतायेत लोकं 

जेव्हां ओषधांसाठी इकडून तिकडे धावतायेत लोकं 

जेव्हां श्वास घेता घेता दम तोड्तायेत लोकं 

तेव्हां करोडोचा एक बनतोय राजमहाल --

जेव्हां आपल्यातीलच मरणाऱ्याला बघतायेत लोकं 

जेव्हां निवडणुकीचा खेळ बनतायेत लोकं

जेव्हां लोकशाहीचा अस्तित्व संपुष्ठात येताना अनुभवतायेत लोकं 

तेव्हां करोडोचा एक बनतोय राजमहाल. --

जेव्हां जगण्यासाठी झगडतायेत लोकं 

जेव्हां पलायनाचा दंश झेलतायेत लोकं 

तेव्हां करोडोचा एक बनतोय राजमहाल -- 

जेव्हां आरोग्यव्यवस्थेत कोलमडलाय भारत 

जेव्हां मृत्यूच्या रांगेत उभा आहे भारत 

जेव्हां सत्तेचा अट्टाहास करताना बघतोय भारत 

तेव्हां करोडोचा एक बनतोय राजमहाल -- 

विटा-दगडांपासून नाही बनत राजमहाल 

माती-सिमेंट पासून नाही बनत राजमहाल 

प्रेतांच्या ढिगाऱ्यांवर, चितेच्या राखेवर बनतोय राजमहाल 

तेव्हां करोडोचा एक बनतोय राजमहाल --

सर्व काही विसरले जाईल 

एक इतिहास रचला जाईल 

जेव्हा हिंदुस्थानात चिता जळत होत्या 

त्या चितेच्या राखेवर बनत होता करोडोचा एक राजमहाल --


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract