STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Abstract Tragedy

4  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Abstract Tragedy

एक होतं छोटसं राज्य

एक होतं छोटसं राज्य

1 min
252

एक होतं अगदी छोटसं राज्य

निसर्गाच्या कुशीत ते वसलेलं

एका बाजूला समुद्र असलेलं

तीन बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं


उपजीविकेसाठी मासेमारी

गृहउद्योग आणि शेती करणारं

मर्यादीत साधन संपत्ती असूनही

अती सुखा समाधानात नांदणारं


एकदा राजाच्या मनात विचार आला

सांगण्यासाठी त्याने दरबार बोलवला

राज्यात सर्वत्र पर्यटन व्यवसाय वाढवून

राज्याचा सर्वांगीण विकास ठरवला


जरी जुने जाणते सरदार आणि

ज्येष्ठ नागरिकांनी विरोध केला

हांजी हांजी करणाऱ्या मंत्र्यांनी

राजाच्या सुरात सूर मिसळला


रस्त्याच्या कामासाठी बंदर आले

पर्यटनासाठी वाहतूक आली

वाहतूकीसाठी वाहने रस्ते आले

रहाण्यासाठी हाॅटेल, दुकाने झाली


यासाठी डोंगर शहीद झाले

पोटातून वाहने घेऊन चालले

अंगाखांद्यावर ईमारती झेलून

सगळीच शक्ती हरवून बसले


असलेल्या निसर्गाची भूरळ पडून

परराज्यातून पर्यटक वर्दळ वाढली

नव्या सोयी सुविधेची गरज वाढली

अजून हजारो वृक्षांची कत्तल झाली


आज दोन तपांनी अतिश्रीमंत राज्य

अमावस्येच्या रात्रीही चकाकत असते

यःकश्चित निर्धन निसर्गसंपन्न राज्यांचा

फुकाचा नसणाराआदर्श बनून मिरवते


चार तपांनी सर्वत्र उद्योग आले आहेत

दळणवळणात उच्च स्थान प्राप्त आहे

परराज्यातील लोकांना नोकर्‍या देऊन

गरीबी, बेकारी, दारिद्र्य वाढतेच आहे


पाच तप पुरेशी झाली या राज्याला

निसर्ग संपन्न हसते खेळते राज्य

पूर्णपणे प्रदूषणयुक्त होण्यासाठी

आनंद घालवून भकास होण्यासाठी


एक होतं कधीकाळचं छोटसं राज्य

निसर्ग कुशीतून केव्हाचच निघालेलं

एका बाजूला प्रदुषित समुद्र असलेलं

नऊ बाजूंनी पर्यावरणाची हानी झालेलं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract