एक दिवस असा येईल..!
एक दिवस असा येईल..!
एक दिवस असा येईल
तुला माझ्या प्रामाणिक मदतीची
प्रत्येक क्षणाला आठवण होईल.....!
आज तुला मांझी किंमत कळत नसेल
ज्या दिवशी अचानक तुझी साथ सोडेल
त्या वेळी सकाळचा सूर्यसुद्धा लाजेल
सायंकाळचा मावळता सूर्य हे पाहून रडेल.....!
प्रत्येक जण तुला विचारेल प्रत्येक जण तुला बोलेल
प्रत्येकाच्या मनात मनमोकळ्या गप्पा मारणारा
आपली ओळख आपसूक करेल.....!
मित्रातला मित्र मनमिळाऊ एक दिवस तो सांगून टाकतो
मी तुझ्यापासून दूर जाईल.
तुला एक दिवस आपलीच आठवण येईल.
तू त्याच्या मदतीची रीतसर यादी जाहीर करील.
मित्राला खरंच गरज भासेल.....!
एक दिवस असा येईल
प्रत्येक वेळेला आपल्याच मित्राचं नाव चर्चेत होईल..!
