Be a part of the contest Navratri Diaries, a contest to celebrate Navratri through stories and poems and win exciting prizes!
Be a part of the contest Navratri Diaries, a contest to celebrate Navratri through stories and poems and win exciting prizes!

Jyoti gosavi

Tragedy


3  

Jyoti gosavi

Tragedy


एक चौकट

एक चौकट

1 min 223 1 min 223

एक चौकट तिच्या

साध्या-सरळ संसाराची

चौकटीला रंगत-संगत दोन

छोट्या चिमुकल्यांची


 चौकटीतला राजा होता      

एक्का हुकुमाचा

 त्याच्या समवेत घेत

 होती आनंद जीवनाचा


 सर्वांसाठी कष्ट उपसणे

 एकच ध्येय तिचे

 आल्यागेल्याची ऊठबस

 आदरातिथ्य सर्वांचे

 असे ते दिवस होते 

सुखाचे आणि आनंदाचे


 हळूहळू बदल झाला

 तिच्या वागण्यात

 अस्वच्छता एकलकोंडेपणा

 राहिला नाही रस जगण्यात


 स्वयंपाकाला फाटा

 मारहाण मुलांना

 बोलत नाही कोणाशी

 फरक जाणवला इतरांना


 पतीराजाचे देखील मन

 हळूहळू गेले उडून

 स्किझोफ्रेनिया नावाचा

 आजार राहीला तिला जडून


 मी एक दिवस तिच्यासाठी

 मेंटलचा दरवाजा उघडला

 आणि त्या दिवसापासून

 आयुष्याचा तोल बिघडला


 अनेक वर्षांसाठी तिला

 घ्यावा लागला उपचार

 आजाराने केले होते

 सगळ्यांनाच बेजार


 वर्षामागून वर्षे सरली 

तिची आठवण कोणा न उरली

 चौकटीतले तिची जागा

 कोणीतरी व्यापली

 तिच्यात माणसांनी तिची

 मान केसाने कापली


 एक दिवस बरी

 होऊन आली घरी

 खुशीचे थुई थुई कारंजे

 डोळ्यात नाचे सोनपरी


 तिच्यासाठी रिकामा

 नव्हता एकही कोपरा

 सगळे माझेच पण तरी

 प्रत्येकजण उपरा


 चिमुकल्यांचे जग आता

 मोठे झाले होते 

तिच्याशी कोणाचेच

 देणे घेणे उरले नव्हते


 प्रत्येकाच्या नजरेतली

 ओळख होती धूसर 

हीच आता झाली होती

 त्यांच्या मार्गामध्ये अडसर


 तिच्या जागी चौकटीत

 बहिण होती छोटी

 वयाने पण छोटी 

आणि पण मनाने कोती 


 हेच का ते माझे घर

 ओळख तीला पटेना

 तिच्याबद्दल कोणाला

 आपलेपणा वाटेना


 नशिबाला आला होता

 एकटेपण आणि तिरस्कार

 यांच्यापेक्षा बरा माझा

 मेंटल चा परिवार


 तिथे माझे सगेसोयरे

 सुखदुःखाची सोबती

 करती राग-लोभ परी

 एकमेकांसाठी धावती


 एकमेकांना देऊन आधार

 करती आयुष्याची वाटचाल

 सांगितले तिने पतीला

 मला पुन्हा मेंटलला नेऊन घाल


Rate this content
Log in

More marathi poem from Jyoti gosavi

Similar marathi poem from Tragedy