एक आठवण
एक आठवण
सदैव आठवणीत राहील,
आपल्या स्टोरी मिररची,
नाॅन स्टाॅप नोव्हेंबर स्पर्धा
लेखकांना मिळत राहिला,
ज्यामुळे लेखन करण्याचा,
एक उत्कृष्ट अनुभव फर्डा
नवनवीन विषयांमुळे मिळत होती,
लेखकांच्या बुद्धिमत्तेला चालना,
रोज उघडत होता एक नवा पडदा
मिळत होते समाधान लेखकांना,
स्वतःच्या प्रकाशित लेखनाचे,
आनंद होत होता पाहून प्रतिसादा
मिळत होते समाधान वाचून,
प्रतिस्पर्धकांचे वेगवेगळे लेखन,
पाहून बहरणारी साहित्यसंपदा
अभिमान आम्हा स्टोरीमिररचा,
ज्यांनी वेळोवेळी प्रोत्साहित केले
अन् आयोजित केली आगळी स्पर्धा
