एक आठवण
एक आठवण
सोडू शकत नाही मी तिचं गाव
आजही आठवण वेडीचं नाव
दूर गेली सोडून ती पोरगी
दाखवून मला स्वप्नं रंगीबेरंगी
माझ्या ओठांवर तिचेच शब्द राव
काचेसारखी तुटून पडली
तिची आठवण मनाला नडली
प्रेमात असा तिने केला घूमजाव
जिवंतपणी मी कसा विसरू
तिचं दुःख इतकं कसा आवरू
माझ्या स्वप्नाला तूच जाळ लाव
लातुरात करतो तुला आठवण
संगमच्या मनात प्रेमाची साठवण
माझ्या प्रेमासाठी तू परत एकदा धाव
