STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

ए.पी.जे.अब्दुल कलाम-गीत

ए.पी.जे.अब्दुल कलाम-गीत

1 min
191

रामेश्वरम भूमी पावन 

धरतीला पुत्र महान 

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम 

सत्य ,संस्कारी कुटुंबात जन्म 


गरीबीत कुटंबात जन्म घेऊन 

गरीबीशी संघर्ष करून 

कष्टाचे होते त्यांचे जीवन

भारताचा त्याना अभिमान 


ध्यास होता शिक्षणाचा मनोमन 

कलेक्टर होण्याचे त्यांचे स्वप्न 

शोधक बुद्धी होती चौकस 

संशोधनाचा त्याना ध्यास 


गोररीबीत गेले बालपण 

गरीबांची त्याना जाण 

देशासाठी वाहिले जीवन 

भारताचे सुपुत्र महान 


ध्यास नावे उपक्रम राबवण्याचा 

मनी ध्यास अध्यापनाचा 

बालमनात देशकार्य शोधण्याचा 

बालमनाचे हीत जोपासण्याचा 


भारताचे महान तज्ज्ञ 

भारताचे विख्यात अणुशास्रज्ञ 

वृक्षप्रेमी हाडाचे शिक्षक 

मिसाईलचे महान जनक 


पद्मभूषण,पद्म विभूषण,भारतरत्न 

देशाचे ठरले अनमोल रत्न 

भारताची ताकद केली निर्माण 

करूनी भारताचे संरक्षण 


छंद होता गाढा अभ्यासाचा 

नवनवी निर्मिती करण्याचा 

नवनवे शोध लावण्याचा 

नवीन उपक्रम राबवण्याचा 


भारताच्या भावी रक्षणास 

लाभले क्रांतीवीर देशास 

कायम कार्याचा त्यांचा ध्यास 

स्फुर्ती लाभावी बालमनास 


त्यांच्या कार्याचा गौरव करून 

भारताच्या राष्ट्रपती झाले विराजमान 

जगविख्यात लेखक महान 

2015 साली झाले देहावसान 


त्यांची आठवण वाचन प्रेरणादिन 

आदर्श ठेवला आदर्श विचारान 

ए.पी.जे.अब्दुल कलाम फाऊंडेशन 

त्यांचे जपले आदर्श जीवन 


 भारतास दरवर्षी होते आठवण 

 क्रांती विचार जगास पेरून 

असावा असा हिरा जगात 

प्रेरणा द्यावी सार्या जगास.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational