STORYMIRROR

Kshitija Bapat

Tragedy

4  

Kshitija Bapat

Tragedy

द्वेष

द्वेष

1 min
214

द्वेष येतो मला त्याचा

पुरुष जो देतो स्त्रीला

स्थान दुय्यम दर्जाचे

स्थान तिला चपलेचे


स्वतःच्या क्षणिक सुखासाठी

करतो तिच्यावर जीवघेणे वार

जिवंतपणी पेटवतो तिला

बळजबरी करून संपवतो तिला


कधी नाचवतो कोठ्यावर तिला

अश्लील चित्रे काढून

घेतो तिचा फायदा

कारण कदर नाही तिच्या प्रेमाची त्याला


वासने पोटी झाला

तो अंधळा

करतो प्रयोग आपल्या बळाचा

त्या अबला ला झुकवायला


तिच्या जगण्याला घालतो बंधन

तिचे जगणे करतो निरर्थक

स्त्रीच्या अब्रूला

देतो काचेची उपमा


म्हणतो तिला मूल्यवान सामान

वेळोवेळी करतो तिथेच अपमान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy