द्वाड कोकरू
द्वाड कोकरू
छोटेसे कोकरू गाल फुगवून बसले,
झालोय मी मोठा
जाईन एकटा डोंगरावर
हाच मनी ताठा
आईचा जीव हळवा
नियम तू पाळावा
नको जाऊ नजरेआड
कोकरू होते फारच द्वाड
नजर एकदा आईची चुकवली
डोंगरावर धूम त्याने ठोकली
नाचणारे मोर , बागडणारेपक्षी
भूरळ त्यास घाली पायवाटेची नक्षी
हिरवा निसर्ग झूळझूळ झरा
आल्हाददायक थंड वारा
इकड़े तिकड़े बागड़त होते
निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत होते
अचानक आली वाघाची डरकाळी कानी
आईची आठवण झाली मनी
भीतीने घाबरगुंडी उडाली
शौर्याच्या गमजा तिथेच गळाल्या
सैरावैरा ते धावू लागले
पाय नेतील तिकडे जावू लागले
पळता पळता अडकले करवंदाच्या जाळीत
वाघाच्या भितीने झाला गर्भगळित
देवाचा धावा करू लागले
मालका सोबत येताना आई दिसली
तेव्हा जिवात जीव आला
पुन्हा असे नाही वागणार
आईस बजाऊ लागला
