दूरदृष्टी
दूरदृष्टी
प्रत्येकाकडे दूरदृष्टी नसतेच
असं म्हणणं ठरतं अयोग्य |
थोडेच जण वापर करतात
संधी पाहून तिचा सुयोग्य | |१| |
दूरदृष्टी ठेवून स्वार्थी काहीच
आवळा देऊन कोहळा काढतात |
दूरदृष्टीच्या चलाख बायका मुद्दाम
नवऱ्याच्या पानांत अती वाढतात | |२| |
दूरदृष्टीच्या शिवाजी महाराजांनी
जलदुर्ग वसवले स्वराज्यासाठी |
दूरदृष्टी ठेवून वृद्धांसाठी सरकार
देई निवृत्ती वेतन योजनेची काठी | |३| |
दूरदृष्टीचा वापर सद्सद्विवेक
बुद्धीने करता मिळे सुख अंतरी |
कुविचाराने वापर तिचा दे क्षणिक
सुख राहतो पस्तावाच जन्मांतरी | |४| |