दूरावा
दूरावा
ती भरल्या डोळयांनी शांतपणे ऐकत होती
आणि तो बोलत होता..!!
अवतीभोवती सगळ्यांशी गप्पा मारत उभी असायची
माझ्या मित्रांना माझी विचारपूस करायची
कोपर्यातून मात्र मलाच एकटक बघायची
माझ्याशी बोलण्याची तळमळ तुझी व्हायची
मार्केटच्या गर्दीत मलाच शोधायची
माझ्यासाठी नटून थटून यायची
मी दिसताच गालातच हसायची
लपूनछपून मलाच बघायची
एकांतात मलाच आठवायची
रस्त्यावरून जाताना नजरानजर व्हायची
मी नाही दिसल्यास कासावीस व्हायची
मी दिसताच मनातच खुश व्हायची
स्वप्नामध्ये मलाच बघायची
दिवसरात्र मलाच मिस करायची
आज दूर जाताना निशब्द होती
व भरल्या डोळयांनी शांतपणे ऐकत होती
भरल्या डोळयांनी शांतपणे ऐकत होती....!!!!!

