STORYMIRROR

Smita Murali

Tragedy

4  

Smita Murali

Tragedy

दुष्काळ

दुष्काळ

1 min
449


दुष्काळ 


वायू जल अन्न साठा

देई सजीवा निसर्ग

फुल फळ नभ नग

भासे धरेवरी स्वर्ग


देई उदंड हातांनी

सृष्टी सजीवांस दान

कसा मानव हा स्वार्थी 

त्याला कशाचे ना भान


कशी अफाट वाढली

धरेवरी जीवसृष्टी 

घाव पडे झाडावर

तशी रुसली ही वृष्टी


हाव मानवी मनाची

करी निसर्ग प्रहार 

शोध सुखाचा वाढता

होई निसर्ग संहार


चक्र दुष्काळाचे असे

फिरे बनून वलय

जाग वेळीच मानवा

बघ येईल प्रलय


जप निसर्ग वारसा

टाळ अकाली दुष्काळ 

कर निसर्गाची सेवा

मग येईल सुकाळ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy