दुष्काळ
दुष्काळ
पडला दुष्काळ असा की
देहाची वाफ झाली SS
जाळू लागला उन्हाळा
पाखरे व्याकूळ झाली
मेघात आसवांनी
गर्दी दाट केली
लाही बनली पिकांची
हिरवळ खाक झाली
कर्जाचा भार वाढला
गोचिडे रक्त प्याली
भंगले स्वप्न सारे
पुढारी निघाले शिकारी
पोटच्या पिलांसाठी
बाप बनलात भिकारी
तडफडून वासरांची
व्याली गाय मेली
वेशीवर गुरांच्या
उरल्यात फक्त खाली
मंदीरातला देव तोही
फिरला आता माघारी
भरल्या दाही दिशांनी
अंधाराच्या पखाली
