दुष्काळ म्हणजे कर्दनकाळ
दुष्काळ म्हणजे कर्दनकाळ
माणसाच्या संघर्षमय जीवनात
नेहमी सुखदुःखे दडलेली
त्यामुळे संकंटांवर मात करण्याची
सवय त्याच्या अंगवळणी पडलेली १
नैसर्गिक आपत्ती म्हटल्यावर
तिथे कुणाचेच काही चालत नाही
दुष्काळ,पाणीटंचाई असल्यावर
माणूस हाल अपेष्टा सोसत राही २
माणसानेच वृक्षतोड केल्यामुळे
सर्वांवर नैसर्गिक संकट ओढावले
पर्यावरण संतुलन बिघडल्यामुळे
माणसाने संकटग्रस्त जीवन अनुभवले ३
दुष्काळ ओला असो किंवा कोरडा
संकटांची मग सरबत्ती होणारच
महापूर,अतिवृष्टी,अवकाळी, ढगफुटी
अशा अति पाण्याने जनजीवन विस्कटणारच ४
कमी पाणी किंवा कोरडा दुष्काळ
सर्वांनाच भारी ठरणारा असतो
नव्हे तो दुष्काळ म्हणजे कर्दनकाळ
जीवनात समस्याच निर्माण करतो ५
ओला दुष्काळ अस्ताव्यस्त पाण्याचा
अतिवृष्टीने सारेच उध्वस्त करणारा
मन थिजवून सैरभैर वाटण्याचा
अचानकपणे येऊन माणसाचा जीव घेणारा ६
पाऊस बेभानपणे पृथ्वीराज बरसून
जनजीवन विस्कळीत करणारा
डोक्यावर दैवाचा घाला घालून
सर्वांसाठीच कर्दनकाळ ठरणारा ७
कुठलीही अतिशयोक्ती घातकच ठरते
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात द्यावा लागतो
तेव्हा संकटांचा सामना करण्यासाठी
माणूसच देवासारखा धावून येत असतो ८
