दुष्काळ एक समस्या
दुष्काळ एक समस्या
अरे दुष्काळ दुष्काळ
आली भयान ही वेळ
नाही चालला काही इलाज
पडला हो ओला दुष्काळ....
नद्या नाले पूर्ण भरती
दुथडी भरुन वाहती
पशूपक्ष्यांचा नाही थारा
माणसांचा हरवला निवारा....
जिकडे तिकडे पाणीच पाणी
डोळा पण येतेय सारखे पाणी
मानवाचा उध्वस्त झाला आश्रय
मानव झाला हो वेड्यावाणी....
फुटलय हो आभाळ
सतत धार लागली त्याला
ओला दुष्काळ पडला
संकटात टाकले मानवाला....
कसा थांबवू हा पाऊस
शेतकरी झालेत बेहाल
पीकांचे झाले नुकसान
मानवाचे झाले हालेहाल....
ओला दुष्काळ पडला
शेतकरी आत्महत्या करतोय
या सर्वांवर बघा हो
शासन पांघरूण घालतोय.....
