STORYMIRROR

Sharad Kawathekar

Tragedy

3  

Sharad Kawathekar

Tragedy

दुष्काळ एक समस्या

दुष्काळ एक समस्या

1 min
396

भिकेची तिजोरी

पैशाचां तुटवडा 

निसर्गाची साथ नाही 

उसाला दर नाही 

कापसाला भाव नाही 

मतांचे राजकारण 

विकासाचा फक्त भासच भास

पाणीबाणी तर पाचवीलाच पुजलेली

गोठ्यातले प्राणी तहानलेले

खायला चारा नाही 

बाजारात प्राण्यालाही किंमत नाही 

झाडांना पानं नाहीत 

प्रत्येक ऋतू शिशीर बनूनच येतोय

गावभर फक्त कोरड्या 

मातीचा फुफाटाच भरलाय

मैल मैल चालून गावाचा

तरूण होतोय स्थलांतरीत

गाव होतोय भकास

शहरं होतायत उदास

प्यायला पाणी नाही 

खायला अन्न नाही 

जगायचं काही कारणच नाही 

जमिनीच्या भेगाबरोबरच

काळजाच्या भेगाही रोजरोज रुंदावतायत

आजचा दिवस कधी संपणार ?

उद्याचा दिवस कसा असणार ?

पण....

दुष्काळ काही केल्या संपत नाही 


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ

Similar marathi poem from Tragedy