दुष्काळ।एक मोठी समस्या
दुष्काळ।एक मोठी समस्या


दुष्काळ। एक मोठी समस्या
त्याची कुणी उकल करेल का?
कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा
कसं हे सारं निस्तरायचं?
खरं तर आपणच याला कारणीभूत
वृक्षतोड,पाणी अडवून केले प्रदूषण
जागेसाठी समुद्रही हटवतोय आपण
पावसानं मग ताळमेळ कसा साधायचा?
शेतकऱ्यानं कुणाकडे बघायचं
आकाश निरभ्र कोरडे
कोरडे पडले नद्या,नाले,ओढे
यंदा पावसानं विचारच बदलला
वर्षभर बरसायचा जणू विचारच केला
त्यामुळे पहावे तिथे पाणीच पाणी
पीक सारे वाहून गेले
ओल्या दुष्काळाचे सावट पडले
किती भयंकर हा पावसाचा क्रोध
कळतंय पण वळतंय कोण
करायचं तेच माणूस करतो
मग निसर्गानं सांगा काय करायचं
रौद्र रूप धारण करून
माणसालाच संकटात अडकवून ठेवलं
दोन्ही दुष्काळाची रूपं दाखवली
माणसाला विनाशाची झलक दाखवली
आता तरी माणसाला जाग येवो
दुष्काळाची जादूची कांडी लागू पडो