STORYMIRROR

Rohit Khamkar

Romance Classics Inspirational

2  

Rohit Khamkar

Romance Classics Inspirational

दुरावा

दुरावा

1 min
41

आज आली तू पुन्हा, त्याच पावली घरी

आनंद आणि स्वागत तेच आहे, वावरलीस घरा जरी


नाहीस जुनी तू केव्हाच, नकारात्मकता काही घेऊ नको

बस काही दिवस शिल्लक, बाळाचा येईल टाहो


मग मी आणी तो किंवा ती, देऊ तुला त्रास

झोप तुझी उडेल, क्षणा क्षणांना भास


आम्ही दोघे एक की वेगळे, समजणार नाही तुला

पण आपण तिघे एक, सारं कळलंय मला


काय बोलू तुला सारं काही बदलतय

उगवत्या सूर्या सोबत, तांबडं नवं फुटतयं


नको आता थोडं फारही, तूझ्या पासून दुरावा

आयुष्या सोबत जन्म सारा, तूझ्याच सोबत सरावा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance