दुरावा
दुरावा


मन हलक कराव म्हणुन किनाऱ्यावर आले
तर त्यांच्याच नात्यात दुरावा दिसत होता
ज्याला अंत नाही असा समुद्र तो
आणि त्यानेच स्वतःपासून दूर केलेला एक किनारा होता
कधी कधी लाटा सुद्धा यायच्या त्या किनाऱ्यामध्ये गुंतून जायला
पण तो त्यांनासुद्धा अर्ध्यावरून ओढून घेऊन जात होता
मग त्या लाटांच्या आसवांची तयार झालेली रेव ती सगळीकडे पसरलेली होती
जेव्हा पायाला चटके भासले तेव्हा कळलं त्या बिचाऱ्या किनाऱ्याचा जीव किती जळत होता
मी तर रमून जाणार होते त्या सगळ्यांमध्ये निरंतर
पण त्यांच्या नात्याचा दुरावा मात्र कायम असाच राहणार होता