मैफिल
मैफिल

1 min

232
तुझ्या नजरेतल्या वाटेवरून
दूर कुठेतरी निघुन गेली होती ती
प्रवास तुझ्या सहवासातला
तरीही एकाकी मात्र पडून गेले होते मी
तिच्यात रमलेला तु
पण तुझ्यात आता नसलेली ती
माझ्यात निस्वार्थ अडकलेला तु
पण तुझी कधीच न झालेली मी
अश्या तुझ्या असंख्य शब्दांच्या लहरीची
सरगम होती ती
पण ती नसताना तू बरखास्त करून टाकलेल्या सुरांची
एक मैफिल होऊन गेले मी