मनाचे तार
मनाचे तार
माझ्या प्रत्येक शब्दात अधुऱ्या प्रेमाचा उल्लेख असतो
हा विचार नेहमी सगळे करत असतात
कोणाच्यातरी आयुष्यात कायमचा धोका ठरलेला असतो
काय करणार प्रत्येकवेळी सगळेच नशीबवान नसतात
प्रेम नेहमी पूर्णच मिळावं हे काही गरजेचं नसतं
कारण खऱ्या प्रेमाची जाणीव अर्धवट मन निभावत असतात
ठेच लागल्याशिवाय कळत नाही घाव किती जिव्हारी आहे ते
पण एकटं कस जगायचं हे सोडून जाणारे मात्र शिकवून जातात
जाणाऱ्याना वाटतं सगळं काही विसरणं किती सोपं आहे
पण काहीच विसरून जाऊ नये हे मात्र आपल्यावर ढकलून जातात
त्यांना तर कोणीही भेटत परत मन जुळवायला
पण आपण कधी सावरू नये म्हणुन आपल्या मनाचे तार मात्र नेहमी तुटत राहतात