शब्दांची ओंजळ
शब्दांची ओंजळ
1 min
244
शब्द ते निरागस सारखे वाहत जातात
तुझ्या आठवणीत मनाशी काहीतरी कुजबुजत असतात
तेव्हा तर शब्दांची ओंजळ असायची तुझ्या हातात माझ्यासाठी
पण आज तेच हात ओंजळीविना रिकामे दिसतात
जगणारी जगतही असतील तुझ्याशिवाय
पण तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही हे बघायला तुझे डोळे भानावर नसतात
जाळून टाक मला तुझ्या त्या न बोलणाऱ्या अग्नीत
कारण त्या निखाऱ्याप्रमाणे माझ्या मनाची स्पंदन सुद्धा आता राख होऊन जातात
आठवण तर तुला येत ही असेल माझी कधीतरी
पण प्रत्येक वेळेला कबुली द्यायला माझ्याच भावना तयार असतात
तु तर मुका झाला आहेस ना त्या शब्दांविना
म्हणुन आता शब्दांची ओंजळ बनवायला तुझ्याकडे बहाणे नसतात